हा लेख हि आमच्या अति तंत्रज्ञ बुद्धीतून जन्माला आलेल्या कल्पना आहेत !!
आम्ही सगळेच कॉम्पुटर चे विद्यार्थी !! एखाद्या लग्नाला जाऊन आलो कि हे असे केले तर किती मजा येईल अशी चर्चा व्हायची !! माझे लग्न ठरले तेव्हा पण अशा किती तरी अभिनव कल्पनांचा उगम झाला !! त्याच इथे लिहित आहे !!
१. कन्व्हेयर बेल्ट वरून आशीर्वाद द्यायला आलेले लोक -
लग्नात सगळ्यात जास्त कोण दमते.. तर वधू आणि वर !! वर खाली करूनच त्यांची वाट लागते !! त्यात भरीस भर मुलगी सांगते " या कि नै आमच्या काकुच्या काकू हम्म !! " (याचा गर्भित अर्थ " पाया पडा " असा असतो ) आणि मग वाका !! पुन्हा नवीन काकू येईपर्यंत वाकून राहता येत नाही म्हणून काकू येई पर्यंत वर या !! वाका वाका ( शकीराचे नाही हो !! ) मध्ये कंबर " मला जाऊ द्या न घरी आता वाजले कि बारा " असे ओरडून सांगायला लागते !! म्हणून आमच्या एका मैत्रिणीने सुचवलेला उपाय !!
लग्नात कन्व्हेयर बेल्ट बनवायचा !! वधू वराने खाली वाकून उभे राहायचे आणि बेल्ट वर मोठ्यांनी चढायचे . एकाच्या पाया पडून झाले कि दुसर्याने यायचे आणि विमानतळावर सरकणाऱ्या सामानाप्रमाणे मोठे पुढे पुढे सरकत राहतील !! यांनी मात्र हात जोडून खाली वाकून उभे राहायचे !!
२. आहेर न देणाऱ्याला जेवण मिळू नये अशी सोय !!
हल्ली आहेर आणू नये अशी तळटीप असते !! पण तरीही मनातून कोणीतरी काहीतरी आणले आहे का असे चपापून पहिले जात असतेच !! तर मग अशी तळटीप लिहिलीच नाही आणि आहेर आणला नाही त्याला जेवण मिळू नये अशी सोय केली तर ?? अशी एक अभिनव कल्पना एका सुपीक डोक्यातून आली .
त्यातून उगम झाला स्क्राच कार्डाचा . आहेर मिळाला कि करवलीने स्क्राच कार्ड द्यायचे आणि मग त्यात आलेला नंबर टाईप केला कि भोजन समयी चविष्ट पदार्थांच्या चवीचा आनंद घेता येऊ शकेल !! हि एक सुपीक कल्पना !!
३. आहेर नाहीतर बाहेर !!
तळटीप बदलून आहेर नाही तर बाहेर अशी केली तर कसे ?? हि आणखीन एक अभिनव कल्पना !!
४. अक्षता टाकणारे मशीन
मुला मुलीच्या डोक्यापर्यंत अक्षता क्वचितच पोहोचतात !! हल्ली काही लग्नांमध्ये रांगेत उभे राहून त्यांच्या जवळ जाऊन डोक्यावर अक्षता टाकणे असा एक प्रकार मी पहिला !! पण तो मंत्र पुष्पांजली नंतर देवापाशी जाऊन फुले वाहण्यासारखे झाले आणि ती कल्पना काही रुचली नाही आम्हाला !! म्हणजे मंगलाष्टके संपली कि मग डोक्यावर अक्षता !! त्यात मजा नाही .
म्हणून दारातून आत येताना पाहुण्यांनी अक्षतांच्या ताटावर हात ठेवायचा !! मंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी त्या अक्षता मशीन मध्ये टाकायच्या !! आणि सावधान असा शब्द आला कि मशीन मधून मुला मुलीच्या डोक्यावर अक्षता पडायला पाहिजेत अशी सोय करायची !! मोठ्यांच्या आशीर्वादाचा आणि अक्षता मुला मुलीच्या डोक्यावर बरोबर पोचतील याचा पूर्ण लाभ मिळेल !!
५. नाव सुचवणारे मशीन
नाव घेणे हा आणखीन एक कठीण जाणारा प्रकार !!
म्हणून डिजिटल स्लायडिंग साईन बोर्ड अशी एक कल्पना आली !! म्हणजे प्रत्येक विधीच्या वेळी घायचे नाव त्याच्यावर दिसेल अशी सोय !!
जो विधी सुरु होईल त्या विधीशी संबंधित नाव त्या बोर्डावर दिसेल आणि मुलासाठी आणि मुलीसाठी अशी वेगळी वेगळी उखाण्यांची यादी सरकत राहील !! यादीतली २ एक नावे घेतली तरी पुरेल !!
अशा किती तरी विनोदी कल्पना मला गप्पा मारताना बहिणी नाहीतर मैत्रिणी सुचवत राहतात !! तुमच्या डोक्यात आहे का काही ऑटोमेशन ची कल्पना ?? आमचे ऑटोमेटेड लग्न बहारदार बनवायला ??
तळटीप : या प्रयोगांची कल्पना एक विनोदाचा भाग म्हणून घ्यावी !! गंभीरपणे घेतल्यास लग्नात ऑटोमेशनचे गंभीर परिणाम भोगावे लागतील
वाचून मजा आली. माझ्या काही सूचना:
ReplyDelete१. "आहेर मनातून द्यायचा असेल तरच देणे", अशी टिप लिहायची.
२. तुमच्या घरच्या लग्नाला बोलाविणे बंधनकारक आहे. (कारण आम्ही बोलाविले ना तुम्हाला)