विरहाचे उन रखरखले डोंगर माथ्यावरती
मिलनास आतुर झाले आकाश आणि धरती
सरसावून आपले बाहू बरसले जणू आकाश
अधीर धरती वेडी आतुरली त्या स्पर्शास
घन गर्द एका राती बरसला श्याम मेघ
आतुर धरती वेडावली पाहुनी तो आवेग
तृषार्त धरती झाली तृप्त त्या स्पर्शाने
ते दीर्घ चुंबन सजले अंगणात पावसाने
Khupach chan..!!
ReplyDelete