हे लिखाण माझे नाही . हे माझ्या ८० वर्षीय आजोबांचे अनुभव आहेत . सगळ्यांनी जरूर वाचा आणि आपली मते लिहा . ती मी त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचे लेखन व्यर्थ नाही हे त्यांना सांगण्याचा एक प्रयत्न करणार अहे.
भारत मातेच्या लाडके , संस्कृतीच्या हृदय स्वामिनी , कृष्णाच्या संगिनी
तुझ्या पुळणीवर … बासरीच्या धुनीवर राधेसह गवळणी आणि आजचे स्त्री मन बेभान होते.
त्या यमुने , तुला आज रांगताना पाहतो आहे. तुझे अवखळ बेभान धावणे..
तुझ्या दोन सहेल्या आणि तु.
या उसळत्या निनादाने , या खोल दरीचा शेवट गाठण्याची स्पर्धा … पण तू प्रथम होतीस आणि या पहाडाने ल्याला होता हिर्या मोत्यांचा हार . ते तुझे अनादी आणि अविनाशी बाल्य मी पाहतो आहे .
बाळे -
तू या परिसराचे सर्वार्थाने जीवन बनून गेलीस . हि सारी माणसे , घोडे , गाड्या , यात्री , शासन यांचे संगोपन करतेस .
हा निसर्ग सुद्धा किती भारावून गेलाय . तुझ्या बाल रूपाचा वेध घेत ह्या हिमशिखरांच्या संगतीत अन्तः करणात वेडावून गेलो.
तुझ्या अबोध जीवनात देव देवतांनी तुझा आश्रय शोधला . तपस्व्यानी ध्यान धारणा केली .
आम्ही सुद्धा आनंद शोधतोय .
पण आज या क्षणी रमवलेस गं
He Dada mamani (dadaaajoba)lihile ahe tech ahe na ....
ReplyDeletedad ajoba pan itka chan lihitat he mala aajch samajla....G8
ReplyDelete