नव्हतास कधी तू माझ्या शब्दांना दाद देणारा ,
पण माझ्या कवितांना साद देणारा तूच होतास
माझ्या शब्दांचा अर्थ कधी समजलाच नाही तुला ,
पण ते शब्द तुझ्यासाठी कधी निरर्थक नव्हते.
माझ्या शब्दांमागची प्रेरणा नव्हतास तू कधी ,
पण शब्दांसाठी प्रेरणा तुझीच असायची.
आता शब्द असतात मनात ,
पण कविता नाही बनत त्यांची.
कविताच हरवली आहे माझी ,
जसे हरवलेत तुझे शब्द माझ्या कवितेसाठीचे , प्रेरणेचे..
मला साद घालशील ??
प्रतिसादात शब्दांची कविता बनेलही कदाचित
No comments:
Post a Comment