ग्रीष्मातल्या एखाद्या रटाळ दुपारीनंतर ढगांची मैफल जमावी , गडगड आवाजाने ताल धरावा , विजेचे नृत्य व्हावे आणि सरींची मैफल जमावी … अशा वेळी अवघ्या सृष्टीने त्या सुरांमध्ये तल्लीन होऊन हरवून जावे असा एक दिवस घेऊन येतो श्रावण … मैफिलीचे पडसाद
उमटतात अवघ्या सृष्टीत … सरी कोसळताना होणारा रव जणू टाळ्यांचा कडकडाट करत असतो …आणि मग … प्रसन्नतेचे नवीन रुपडे लेवून धरणी प्रतिसाद देते पावसाच्या मैफिलीला आणि नकळत ओठांमधून शब्द
उमटतात वाह ..या मैफिलीला भैरवी नको ..यंदा हि मैफल जमतच नाहीये ... पावसा कधी येशील ?
No comments:
Post a Comment