तू आयुष्यात आलास.... असा ...जसे घोंगावत वादळ यावे . आणि मग त्या वादळाने मागे आपल्या खुणा ठेवाव्यात ! अस्ताव्यस्त , सैरभैर झालेल्या गोष्टींनी आठवण करून द्यावी त्या वादळाची ...मग त्या वादळाच्या तडाख्यात आलेल्या वस्तूंच्या अस्तित्वाच्या फक्त खुणा राहाव्यात . आणि मग नवीन आयुष्याची सुरुवात व्हावी !!
अगदी तसाच आलास माझ्या आयुष्यात !! सैरभैर झालेले माझे मन माझ्याच अस्तित्वाच्या खुणा शोधत राहिले !! पण माझे अस्तित्व मी म्हणून संपून गेले होते !! तूच भरून राहिला आहेस !! मनात ....श्वासात .... आणि माझ्यातल्या अणु रेणू मध्ये !! आणि हे वादळ माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात घेऊन आले आहे हि एक हळुवार जाणीव मनाला स्पर्शून गेली !!
आता आपल्या आयुष्यात जी वादळे येतील ती आपली असतील ...तुझी आणि माझी ....
नवीन आयुष्यात प्रवेश करताना मी हळुवारपणे माझ्या आठवणींचा शिंपला उघडून पहिला आणि मला मोत्यांची रास मिळाली ....
आपल्या आयुष्याच्या वादळांमध्ये त्या आठवणी धूसर होण्याआधी त्यांचा नजराणा .... माझ्या आयुष्यातल्या वादळा...

No comments:
Post a Comment