Sunday, January 31, 2010

मी संपलो आहे .

भोलानाथ चे गाणे म्हणत म्हणत चुकवेगिरी शिकत मी मोठा झालो. आणि त्यातच शिकलो कि दुपारी आई झोपली कि लाडू घेतात तसे जग झोपवून किंवा जगाला गुंगारा देऊन लाडवाची गोडी चोरायची अगदी आवाज ना होऊ देता !!!

एखादी गोष्ट कशी टाळावी हे मला चांगले माहिती होते  असा मला सार्थ अभिमान होता. मित्रमंडळ चांगले गोळा झाले होते.... कारण माझा बोलका स्वभाव!!! हम्म ... थापा मारण्यात माझा हात कोणी नाही पकडू शकले. आणि समजा  कोणी पकडलेच तर मी उत्तमरीत्या गुंडाळायचो आणि मग म्हणायचो " अरे मी असे म्हणालो होतो असे नाही. तू असे ऐकलेस का ? " किंवा " तू नेहमीच confused असतोस  मला कशाला गोंधळात टाकलेस  ? " असे म्हणायचे आणि समोरचाच किती मूर्ख आहे हे सिद्ध करायचे ते हि चार चौघात त्याला नावे ठेवून !!!

हो... मी कधीच पकडला  गेलो नाही. नशिबाने कर्तृत्ववान बायको मिळाली .आणि तिला पण असेच थापा मारून पटवले होते ते निराळे .  लांडगा आला रे आला असे म्हणायची वेळ मी कधी येऊ दिली नाही कारण ते देखील मी शाळेत शिकलो होतो. कि लांडगा एकदाच आणायचा आणि मग पुढच्या वेळी काहीतरी दुसरे निमित्त.पण लोकांचे आकर्षण आपणच बनायचे हा माझा यशस्वी प्रयत्न असायचा

घरातला करता सवरता मीच आहे असा आभास मी ऑफिसात आणि ऑफिसात मीच शहाणा असा आभास मी घरात निर्माण करून ठेवलेला . त्यामुळे घरातला पळपुटेपणा दाखवायचा असेल तर मी ऑफिसला जायचो आणि ऑफिसात घरातली थाप पचायाची आणि अगदीच काही नाही झाले तर माझे अपघात ठरलेले होतेच. तो पण मी लोकांना गुंडाळण्यासाठी रचलेला एक कथेचा भागचअसायचा.

एकंदर काय ? तर मी सगळ्या जगाला मूर्ख बनवत आहे आणि ते बनत आहेत असे  मला ठामपणे वाटत होते .

काळ भ्रमाचा  भोपळा फोडतोच एकदा तरी !! हो माझा पण भ्रमाचा भोपळा फुटला .  पण खोटेपणाची सवय यावेळी काही कामात येत नाही आहे. मी स्वतःशी खोटे बोललो तरी सत्य बदलणार नाही आहे .   मला cancer झालाय . blood cancer !!! 

खोटेपणाचा cancer ?  तो फार पूर्वीच झाला होता .आता मला खरे पचतच नाही. खरे कोणी बोलले तर उलटून जाते आहे . पोटात पाणी झाले आहे . आणि मी लाजेने पाणी पाणी होत आहे  . ते समारंभ जे दुसऱ्यांचे होते. ते मी हिरावून घेतले होते,  अगदी गोड बोलून!!! कोणीतरी हिरावून घ्या  माझा हा त्रास असे मला वाटते आहे. गोड सगळेच बोलत आहेत . पण त्रास माझाच आहे. तसाच जसा त्यांचे यश हिरावल्यावर गौरव माझा असायचा... फक्त माझा !!!

खोटे जग का नाही बनवता येत आहे मला माझ्या भोवती ? बायको च्या चेहऱ्यावर चे रडे खरे आहे ?  कि तो पण आभास ? मी जाणार हा आनंद लपवते आहे  का ती ? आयुष्याच्या सगळ्यात मोठ्या असत्यातून तिची सुटका होणार आहे नं आता ?  

मी मरतोय ? खरेच मरतोय ? आज पर्यंत लोकांना फसवून जाळले आणि आता सरणावर मला चढायचे आहे . मला मरायचे नाही. मी मरणार नाही असे कितीही आकांताने ओरडलो तरी मी मरणार आहे. मी संपतोय... मी संपतोय....

मी संपलो...... आज सत्य- असत्य यातून सुटून एका अटळ सत्याचा सामना करतोय. मी आता संपलोय. आयुष्याचा शेवट हे एकच सत्य होते. त्याचा ना आभास होता ना मी कोणाला फसवू शकलो. आज काळाने मला फसवले. त्या प्रत्येक फसवणूकीपेक्षा मोठा घात झाला आहे. माझ्या कुटुंबावर आघात झाला आहे. मी संपलो आहे .

मी जगाला फसवले. आणि एक दिवस पुरता फसलो. शेवट झाला आणि हे समजले. आता व्यर्थ हे सारेच टाहो असे वाटतंय... कारण मलाच मी संपवले त्याच दिवशी जेव्हा मी लाडू चोरला आणि आता..... लाडू आहेत पण मी संपलो आहे .

Friday, January 22, 2010

Celebration at home

India wel comes every thing . Although it was not a gold medal , India had celebration of Abhinav Bindra's success in Olypics. Same happened with me when I came back with the success story.

I was driving towards home and I called up home. Told my father that I was selected but for testing. He was happy to hear my success story. And he told all the guests those were there at home for my sister's marriage.

I was confused and came back home with the same expression which was there on my face in college. Madhu hugged me and congratulated. It was something I really needed but not for sharing joy but to feel some one is there for my support when I am away from home. ( I was badly missing my sis who was home and was preparing for her marriage ) .

I called my placement coordinator at 12 am. She talked to me nicely and said that she knows the person (angel) very well and he keeps his promises so I should start with Industrial training in testing.

All in the hostel were very excited about me getting placed. All were happy for me.  They Congratulated me .
I was happy for that period of time when I was receiving calls from home and all my relatives to wish me, when all were celebrating my success.

Still I was not happy but could not express that to anyone. I talked to Kaka Kaku ( my local guardians ) and told them about the field and my fear.

Kaka the person at the age of 70,  was trying to know the details of my field and then said try and talk to them once.
Kaku said " zop aramat " . This is what I always loved about her when she used to ask me to relax.

I had my dinner and went to bed with a sleepless eye.  It was not having relaxed feeling. Still there was something which I was not able to talk to anyone. Which I was not able to express. Even I am unable to express that feeling now. It was something which was mine.

It was the new beginning....

But the fear of end was there.

Wednesday, January 20, 2010

श्रीखंड मिळतं, पण माणसं मिळत नाहीत

परवाच माझी लेक अमेरिकेला गेली. जाताना आनंदात होती. खूप जास्त !!! जणू काही तेच तिचे आभाळ होते आणि आता तिला तिथे मुक्तपणे उडायला  मिळणार होते.

आम्ही मध्यमवर्गीयच तसे !!  तिचा जन्म झाला तेव्हा  घरात २ लोखंडी खुर्च्या आणि ह्यांच्या बाबांची लोखंडी  कॉट होती. माहेरून आलेले डिंकाचे लाडू संपेपर्यंत काय तो मला आराम मिळाला होता. पण तिचा जन्म हा जणू आमच्यासाठी सुख घेऊन आला. मामंजी म्हणाले तसे तिच्या रूपाने लक्ष्मी  आली घरात.

 ह्यांची प्रगती झाली. हा बंगला झाला आणि  मग दृष्ट लागेल असे सुख घरात आले. म्हणून हिचं नाव 'संपदा' ठेवले ते सार्थच असे मामंजी नेहमी म्हणायचे.  मामंजी गेले आणि आमचा त्रिकोणी संसार सुरु झाला.

संपदाची स्वप्नं मोठी होती नेहमीच !! तिला तिच्या बाबांसारखे business करायचा , मोठे व्हायचे, self identity मिळवायची  हेच वाटत राहायचे. अभ्यासात तर जात्याच हुशार होती ती.

 कधी कधी वाटायचे कि या दोघांपुढे माझे विचार किती खुजे आहेत. नवीन फ्रीज आणला तेव्हा  तो खराब होऊ नये म्हणून मी त्यात पेपर  अंथरला होता.' कित्ती टिंगल केली त्या दोघांनी मिळून माझी ! ' ...पण माझ्या माहेरचे साधे आयुष्य पण ते दोघे तितकेच enjoy करायचे !! म्हणून मग मलाच माझा हेवा वाटायचा. ' किती नशीबवान आहे मी  !!  सोन्याचा नाही हिऱ्या माणकाचा संसार वाट्याला आला आहे माझ्या ! ' असे उगाच वाटून जायचे .

ती शिकायला दिल्ली ला जाणार म्हणाली तेव्हा मी अगदी घर डोक्यावर घेतलेले . मग पुण्यातच शिकायचे पण MS साठी तिला जाण्याची परवानगी द्यायची या अटीवर माझे रडे थांबले होते.  एकट्या पोरीला पाठवायचे कसे? बरे हिला अक्कल तरी पुरती आहे का ? असे भलते जग झाले आहे .हल्ली काय काय ऐकायला मिळते ! दिल्ली तर नकोच नको.

वाटलेले... विसरून जाईल MS चे खूळ हळू हळू. पण महत्वाकांक्षा काय तिला गप्पा बसू देते थोडीच ? आणि नाही नाही म्हणत अमेरिकेला जाण्याच्या परीक्षा , scholarship सगळे तिला हवे तसे घडत गेले. मी हरले नेहमीप्रमाणे !!

'तिचे यश तिला दूर घेऊन जाईल .दूर माझ्यापासून ..... माझ्या संस्कारांपासून !!'  हि भीती मला कायमच होती.

' तिथे जाऊन ती तोकडे विचार , तोकडे कपडे, यांच्यात हरवून जाईल ....मला विसरून जाईल . एखाद्या भारतीय मुलाशीच लग्न करेल न ? कि कोणी गोरा माझा जावई होईल ? ' हे विचार कायमच मनात घर करून होते.

जेवताना तिचा फोन  आला कि घास गळ्यातच  अडकायचा .  गळा दाटून यायचा आणि मग तेच पाणी पिऊन पोट भरायचे . असे करत वर्ष गेले आता !!!

शेजारच्या नेने काकू गेल्या मुलाकडे तेव्हा संपदा साठी म्हणून  मुद्दाम श्रीखंड पाठवले मी . वाटले कि हसेल ती !! फ्रीज च्या वेळी हसली अगदी तशी . मला वेडी म्हणेल .तिचा बाबा म्हणतो मला तसे.

पण वाटले गोरी माणसे पाहून विटली नसेल . पण ते अन्न खाऊन तर कंटाळा आला असेल ना ?  म्हणून उगाच काहीतरी खाऊ!!!  नेने काकुनी काचकूच करून पाव किलो चा डब्बा नेला फक्त !! त्यांना पण मुलासाठी काय काय न्यायचे होते म्हणा !! नाहीतर नेले असते त्यांनी . अशी मीच मला समजावत राहिले.

इतक्यात फोन  खणाणला . पलीकडून संपदाचा आवाज आला  " आई ग कशी आहेस ? " आवाज ओला होता का ? रडत होती का माझी पोर ?

" काय गं?  रडतेस बाळा ? "   माझाही आवाज कापरा झाला होता

" नाही गं !! जराशी आठवण आली सगळ्यांची !! श्रीखंड मिळतं, पण माणसं मिळत नाहीत गं आई !! "  आता मात्र ती माझी लेक वाटत होती. तिच्यातला खंबीरपणा अचानक कुठे हरवला होता कोण जाणे ?

संवाद संपला पण वाक्य मनात घोळत राहिले " श्रीखंड मिळतं, पण माणसं मिळत नाहीत"

माझी मुलगी तीच होती . तिचे विचार , संस्कार तोकडे नाही झाले. फक्त देश बदलला . भावना नाही . मी हरले नव्हते . माझे संस्कार जिंकले होते. मला तोकड्या वाटणाऱ्या दूरच्या देशातही!!!!

Tuesday, January 19, 2010

स्वप्नाच्या गावा जावे

खुप वेळा ' मन रानात गेले गं , पाना पानात गेलं ग ' असे गुणगुणत उड्या मारत रानात स्वछंदपणे फिरावेसे वाटते . एखादे छान गाणं कानावर पडावे ..अणि मग मी त्या गाण्याची नायिका व्हावे अशी एक कल्पना किती सुखद असते !!

आयुष्य क्षणभर कुठेतरी थांबले आहे असे उगाचच वाटते . पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडतो आहे . आणि बैलगाडी चे सर्जा आणि राजा गळ्यातली घुंगरांची माळ वाजवून रस्त्यातल्या लोकांना आपण येत आहे अशी ग्वाही देत आहेत. मी त्यांना "हुर्रर्र " म्हणून वेगाने चालायला सांगते आहे आणि मग हलकेच माझा वेग वाढला आहे असे वाटायला लागते.

पण मग जाणवते अरे गाणं कानावर पड़ते आहे ..पण आपण पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यावर आहे . भोवताली जे सुन्दर तलावाताले पाणी वाटते आहे ते रस्त्यावरच्या खड्ड्यात जमलेले बाजुच्या फुटक्या drainage pipe  चं पाणी आहे .मागे कानाशी वाजणारे हॉर्न चे आवाज मला माझा वेग वाढवायला सांगत असतात.  घुंगरांच्या आवाजाइतका  सुखद भाव मात्र तिथे नसतो . "हुर्रर्र" आवाजाने सर्जा राजाला मी गोंजारते आहे अशा सुखद कल्पनेला तडा देणारा आवाज येतो " ओ बाई हला  कि , आssss ईsssssला काsssय वैताग आहे !!! "

कल्पनेतल्या गावातल्या रस्त्यांवरून मी माझ्या झोपडीत येते . आणि मग अग्गबाई अरेच्चा मधल्या गाण्याप्रमाणे  " मेघ सावळा माझा राजा  , भोळा भाबडा माझा राजा .. माझ्यावरी त्याची डोंगरा एवढी माया " असे गुणगुणत असताना ...राजा येतो ,खांद्यांवरून गवताची गंजी खाली टाकतो.रांगडा वाटणारा कल्पनेतला राजा ओंजळीतून पाणी पिताना हलका इशारा करत आहे  असे वाटायला लागते. त्यावेळी त्याने खांद्यावरून खाली टाकलेले गवत पण सुंदर वाटत असते.

कल्पना रंगत असतात ...

आणि वास्तवात मी खड्डयातून गाडी काढत पुढे निघालेली असते. इतक्यात घर येते. माझी गाडी पार्क करून मी माझ्या घरात जाते. घराचे टाळे माझे स्वागत करते आणि मी स्वगत करत घरात शिरते.... ' रोज कुलूप उघडायला मीच .. एक दिवस ह्याला लवकर नाही येता येत. '  गाण्यातल्या प्रेमाची जागा माझा त्रागा घेतो. आणि मग मेघ सावळा आजिबात वाटणार नाही असा माझा शहरी नवरा घरात शिरतो.  हातातली भाजीची  पिशवी खाली ठेवतो. आणि ' पुन्हा हीच भाजी . जर्रा म्हणून काही वेगळे आणायला नको ' असे आवाज ओठात अडकून राहतात. गवताच्या गंजीकडे कौतुकाने पाहणारी मी  भाजीकडे पाहून संतापते.  ( पुन्हा वैताग !! ). " जरा पाणी देतेस ? "  त्याचा आवाज येतो .  " रोज काय रे मीच पाणी आणायचे. मी पण आत्ताच आले आहे ना? " माझा आवाज गरजतो. कल्पनेतल्या इशाऱ्याची जागा त्याच्या तीक्ष्ण कटाक्षाने घेतलेली असते.संध्याकाळी चुलीपाशी फुंकणी हातात घेऊन मी बसले आहे. भाकरया भाजते आहे. आणि माझ्या डोळ्यात धुराने पाणी आले आहे . मी डोळे चोळते आहे आणि माझा नवरा जवळ येऊन डोळ्यात फुंकर मारून माझा त्रास कमी करतो आहे . आनंदात भाकरी भाजी हातावर घेऊन अन गोड मानून आम्ही खात आहे. असे स्वप्न पाहताना....

पिझ्झा चे खोके घेऊन चिरंजीव शिरतात आणि " आई गं आज तुला सुट्टी !!! Dominos ने नवीन  flavor आणला आहे म्हणून मी आपल्याला पिझ्झा आणला आहे ." असे जाहीर करतात . मग काय ??  हातावरच्या  भाकरीची जागा पिझ्झा घेतो . भाजी वेगळ्याने घ्यावी लागत नाही,  ती त्यातच आलेली असते . पण तो पिझ्झाहि हातातच घेऊन आम्ही गोड मानून खातो. ( मुळात त्याचा कंटाळा आलेला असतो , कल्पनेतली भाकरी आठवून जीव तुटत असतो . ' कार्ट्याला कसले पिझ्झे आवडतात ?' असे वाटत असते  )  .चूल लावलेलीच नसते त्यामुळे धूर , नवऱ्याचे कौतुकाने जवळ येणे स्वप्नातच राहते.

रात्र होते.... " शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला , थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला " असे शब्द गुणगुणत मी खोलीत येते. आणि आता मात्र ... स्वप्न खरे होईल असे वाटणारे वातावरण माझ्या साजणाने खोलीत निर्माण केलेले असते. माझ्यासाठी आणलेला मोगरा खोलीत दरवळ पसरवत असतो.

अचानक सर्जा राजाला " हुर्र्र" म्हणताना फेटा घालून बसलेला माझा नवरा , पाणी पिताना इशारा करणारा रांगडा गडी वाटणारा माझा नवरा , चुलीपाशी डोळ्यात फुंकर घालणारा माझा नवरा असे सगळे जण माझ्या शहरी नवरयाच्या भोवतालून मला खुणावत आहेत असे वाटायला लागते.

मी मनातून लाजून जाते. एवढा वेळ मनातल्या मनात चालू असलेले गाणे मी गुणगुणायला लागते.

स्वप्नातला दिवस आणि स्वप्नातला गाव नसे ना का नशिबात ....पण स्वप्नातला राजकुमार आता माझा राजा आहे या वास्तवातल्या जाणीवेने मी सुखावते आणि पुन्हा एकदा "स्वप्नाच्या गावा जावे"  म्हणत नवरयाच्या मिठीत शांतपणे झोपून जाते .

Sunday, January 3, 2010

BABA VI

Baba is the cool man. I always had a circle of friends and that to boys round me. I never liked to be with girls and keep on gossiping.

This is a funny incident which I remember when one of my friend's came to my place for the very first time.

It was evening. Baba came home from office. Usually he used to enter from the gate 1 of our building. But on that day he came from gate 2 which was a direct gate to our building. He saw a boy standing with his scooter near gate.

He came upstairs. I was talking to Vaibhav ( My rakhi bhai now. Those days he was a new friend sharing his books with me ).He was standing outside the door and I was standing in the door and was talking to him. As I saw baba on the staircase I asked Vaibhav to leave ( with my eyes pointing towards baba ) .Mean while he had reached the door.

He was knowing Vaibhav as he was a frequent visitor to our place and was a good friend of mine. Vaibhav greeted baba. Baba asked him to come in and asked  " toh khali alela mulaga tuzyasobat ahe ka ? "   I was not knowing that Vaibhav has come with someone who is standing downstairs for him . It was more than an hour and me and Vaibhav were discussing the study stuff .

Vaibhav had expression of fear on his face and said "Toh mazyabarobar ala hota hila olkhat nahi mhanun khali ubha ahe " . Baba looked at him and said " Ja tyala gheun ye.  Ase khali ubhe nahi karyache"

When Vaibhav went downstairs he looked at me and said " Ase darat ubhe rahun mulanshi gappa nahi maryachya. Tyana aat basava ani vatel tevdha vel gappa mara. "

 Vaibhav came up with the boy. It was co incidence that one of the Industrialists in Nagar was the boy's relative and baba was knowing complete family of that boy. The communication began.

Baba :  Kay Nav tuze

Boy : Nilesh Bothra

Baba : te Paras vale Bothra tuze kon ?

Boy : Mama


Baba : Mamache ani Tumache adnav same ahe ka?

Boy : Nahi mhanje te mazya pappanche bhau lagtat

 
Baba looked at me and Vaibhav who were sitting on the sofa and enjoying the talk.

Baba : Relations samjatat ka re tula ?   Babanchya bhavala kay mhantat ?

Boy : Kaka

Baba : Mag te tuze mama kase? ?

Boy : te papanche mama lagtat.


Baba : Aai chya bahinila kay mhantat ?

Boy : Mavashi

Baba : Babanchya bahinila kay mhantat

Boy : Me aunty mhanato. Mala marathitun nahi mahiti.

 The conversation became a fun for all. We all were enjoying the talk and Nilesh was totally scared. He was not knowing whom to call what and was thinking that baba did not like him to come to our place.

Then baba laughed loudly and looked at me and Vaibhav and said  " Asala kasala mitra are tuza ? Tyala nati pan nahi sangta yet "  We all laughed and the boy was embarassed.

Next morning Nilesh came to me and said he found baba very stirct and he was sorry if baba has scolded me after he left our place.

When Nilesh and Vaibhav left , the fun was over and baba was normal.

He became friend of every friend of mine. He showed dislike towards what he did not like but he always had his own ways to teach us and they were always different .

My Decision

Yes !! It was really difficult to chose from 'Live or Leave the moment'

It was easy to leave but what if I live this moment ? Will there be any life after this moment ??

Although I was poor developer and a best destructive mind ( from childhood there were many things destroyed ( broken ) by me ).
But as everyone dreams for being a developer when he/she gets into computers , I also had a dream of being developer.And I had an opportunity ( which really was not possible to grab in the recession period ) but I was unable to decide because it was not the one which I had thought of.

I messaged my best friend " I am selected but for testing. What should I do?" he replied in a moment saying " Great! Say Yes" . It was something I was not expecting from him. I tried to get phone number of the placement coordinator. But I could not call her.

Meanwhile people from Spring were calling the selected candidates and were talking to them in a closed room .( I was wondering what are they talking about )

Swati kept on encouraging me and kept on saying that testing is something which I should go for. I was confused ( I was thinking about the myths we usually talk about that ' there is no growth in testing', ' testing is something which people opt for when there is nothing left for them in development because they are dumb', 'Tester sits on the chair and does nothing' and what not. Everything discouraging  a person who is  going to be a tester )

I was thinking "Why did they select me ? "

Mean while they called me in the room, I went in and then .......

They congratulated me formally. My angel asked me to take a seat. He asked me if I want to say something.And I was scared but dared to say " WHY ME  ???" . He kept the paper of mine on desk and said " What do you think , how did you perform???" . ( Yes ! as every one feels after exams... I was feeling the same ' I would have done better if i would have prepared')
" I don't know " I replied and continued " What if I say no ?" ( I was confused and was scared to get into testing ) but he was calm and said " If you say no to us then some one else will pick you up. What is your decision???"

My mind started talking to me ' Do or die .... Why not to give a try to do than dying ? I do not want to die. I want to try. ( My friend's message was something I was playing with in my hand. I opened that and closed that when I was talking to the angel). But all friends will look  at me saying " You opted for testing ? You deserve better ..... better .... better ( echo like films was there in mind) " Do I really deserve development? No .....I cant write a better program ( I hate syntax ....although I know logic I cant present ) I can direct a program but can't write a program. What to do????????? "

" So why should I select you for development ? " a sound bombarded and broke the thought process.

" That is what I am asking.... WHY ME ??? " the conversation turned nice

"You can improve yourself " he said.  " How ? " - me  " By writing programs and practicing them. "

"OK lets try. If you improve then you can switch from testing to development. Lets try. Complete your industrial training in Testing "  he said.

" But isn't there any problem with the grades I get and testing ? " - me

"You confirm with your teachers and let me know. But Swati too is opting for testing and as per my knowledge there isn't any problem with the testing project. So whats your decision? "

"Yes" .. I said .

There were mixed expressions !! And most part of that mixture was fear which came out of my decision and a feeling of ' What if I go wrong ? '

I got up from the chair and walked to the door ......." Rupali... " Angel's voice........ " There are some projects on  Wifi to come in June. We will think about you to work on one of them "  He tried to get me out of tension and make me feel relaxed. ( Wifi was one of my presentation topics which we had discussed for longer time in my interview )  I smiled and said " Thank you Sir ... Thank you very much"

I saw at the devils . They had a pasted smile on their face ( May be due to Copy Paste they were able to Copy angel's smile this time and pasted on their scary faces ) .I felt devils were laughing at me and were thinking ' What is there to select a fool? ' 

And I came out with tension of getting testing as my field, with the thought of the reactions from my friends , with the joy of getting selected , with a decision to call my placement coordinator ( although it was 11.30 at night ) and talk to her regarding what if I say no ?

I had success in hand but I was unable to enjoy !!! It was like I had a medal in Olympics but it was not a gold medal.

4 th July - Day of Interview

Morning of 4th  July was full of rush (Not for me. For my room mate Madhu )

Madhu was running here and there for getting things in my hand and she did every possible thing.

I remember tika. Praying for me and then putting tika as per tradition.

(We did not have arati else she would have done that as well)

She got my dress (very well ironed and washed (as per my orders from Nagar ) ) .

I forgot that on bed and then shouted from bathroom to get my dress for me ( I usually do this with Teja ( my sister ) when I am home )

She checked my bag (as it is my habit to forget the things (especially I card and mobile) whenever they are actually required)

And yes…. my I card was missing.

I was unable to recall where it was before I left for Nagar. Then I threw all clothes out from my cupboard.

After a big mess in the room I got the I card.

I checked the file for all my certificates.

I was ready with everything and for everything ( except the Technical Test ).

Kaku ( the lady who took care of me as a mother for two years and I stayed there in her house ) smiled at me and wished me luck.

I came out and………………..

 “Shit !! “ …………. I shouted .

 It was not any slang but actually there was shit on my Kinetic Honda.

It was a so called cute cat of ours who used my foot rest  as a commode and then it was SHIT !!!

Madhu was about to sleep when I left and I shouted and asked her to get a water bottle to clean the bike.

After all this I finally left for college.

All were already present and presentation had started.

I entered the Seminar Hall with and sat down with Swati.

Ohh !!  The slides there were full of embedded operating systems which I had read somewhere in books but never used (Except Windows which I had on my PC and I was able to play songs on that )

All appeared for test and …….shocking !!!!! I was short listed for next round.

Technical interview was something which I really don’t want to talk about.

I was feeling as if two devils were sitting with a fork and knife in hand and were thinking about where to start from and eat to finish me.

There were typical answers for which I was prepared and those were “I don’t recall that now “ , “I am sorry I don’t know”

After coming out of the hall I gave a glance to my friends telling “ No Chance !! “ with my thumb pointing towards the floor.

Then came an angel. He conducted HR  interview. He showed interest in every small thing which was there in my resume.

I opened my mouth and my mind as well. I wanted to talk more and more and he was ready to listen everything. I told him about my projects, seminars, presentations, me as a best student of college everything.

He just had a smile on his face and I was feeling like a breeze after I am out from a detention room of technical interview.

I was sure to get selected after that interview and felt " This is the place to go for “

But ……..

Life is not that easy. They were not happy with the candidates and came up with a program in Data Structures.  They asked to write a program.

It was already 8.30 . I was tired of getting rejected. And this was a point where I was about to get selected and again “ Muh se nivala chin gaya “  was the thought which came in my mind after I heard about the test.

Yes !!! My paper was almost blank (except I was able to define variables)

Me and Swati ( my friend -C minus minus girl like me and my good friend because we share same likings ) were sitting on the stairs outside the department thinking of next day and planning for next company to prepare for.

And the results were out in some 20 minutes

( This was the time when I was feeling like I am in the hospital and doctors are coming out and saying  “ Ab sab uparwale ke hath me hain “ )

Our HOD said “ Tanushree and Swati are selected” ( I was not there ) and then he said “ Rupali is selected if she is interested in testing”

A new twist ….

Whether to say Yes or No  ???


That is in next post of course………………..