Thursday, December 3, 2009

कातरवेळ

आयुष्य झर्रकन पुढे सरकत जाते  ,

काही चूक काही बरोबर गोष्टींना सोबत घेउनच .

जमा खर्चाची वही महिना अखेरिला उघडते ,

आणि कमावल्या गमवाल्याचा हिशोब आयुष्याच्या अखेरिला !!!

अचानक एका कातरवेळी  आठवतो भूतकाळ ,
                                                                             
ज्याच्या नावातच भूत आहे त्याच्या आठवण येण्याने दचकणं हे  ओघानेच आले!!!!!

गमावले जास्त आणि कमावले कमी असे  उगाचच वाटायला लागते ,

जुनं  पुराणं सारे काही  मागणे मागायला लागते!!!!!

दाटून येते  मळभ मनावर, इतके की जणू बरसणार धारा डोळ्यांतुन असे वाटायला लागते ,

इतक्यात दिवेलागण होते आणि तिन्हीसांजा  रडू नये हा संस्कार आडवा येतो ||

दाटलेले मळभ, पिन्जलेल्या कापसाला  डब्यात बंद करून ठेवावे तसे मनाच्या कप्प्यात बंद होते ,

वाट पाहत राहते .........पुन्हा एका कातरवेळेची ,

दाटून यायला आणि बरसून वहायला  !!!!!!!!!!!!!!!!!!

- रुपाली

2 comments:

  1. chhan ahe khup.... Katarvelechi vaat pahate sadhya tyamule samaju shakate... :)

    ReplyDelete
  2. हरीण रुपाली
    (दचकू नकोस...हरीण रुपाली...म्हणजे...Dear Rupali चे स्वैर भाषांतर आहे...)
    तुझी बहिण (सख्खी का मावस का चुलत माहित नाही...) बर्याच वेळा follow up करत होती तुझा ब्लॉग वाचा म्हणून...म्हणून आज मारली धडक...
    छान लिहितेस गं...अरे एवढं लिहितेस हेच खूप मोठे आहे...आजकाल एकूणच वाचनाची आवड गळायला लागली आहे (गळायला, गळाला, गालाला...प्रत्येक मराठी शब्द कसला powerfulllll आहे नं?) असो...

    तुझी बहिण म्हणजे आपली 'आरती' गं...सिन्नरकर...
    बाकी तू किती मोठी आहेस मला माहिती नाही...मी आपलं पहिल्याच भेटीत एकदम अगं तुगं वर सुरुवात केली...पाहिजे तर याला शुद्ध पुणेरी आगाउपणा म्हण...ए पण मी आहे नं आरतीचे इतक्या वेळा पाय ओढत असतो...बिचारी कधी रुसली नाही बरं का...काय आहे माहितीये का? कोणी मराठी बोलणारं भेटलं नं कि मला पण जरा बरं वाटतं...
    अशीच लिहित राहा...मी आहेच वाचायला...आणि तुझ्या guestbook मध्ये खोड्या करायला...:)
    -श्रीपाद गांधी (shreepadg@gmail.com)

    ReplyDelete