रोज सकाळी १० ची बस पकडायला धावत सुटणे आणि मग बस मिळेपर्यंत स्वतःशी गुज करणे हा माझा नित्यक्रम आहे . माझ्यासारख्या पस्तिशीतल्या बाईचा जो विचारांचा गुंता असावा तोच असतो मनातल्या मनात चालणाऱ्या गप्पांचा विषय . पण गेले काही दिवस माझ्या मनात द्वंद्व सुरु आहे . विचारांचेच !!! आणि तोच माझ्या मनोरंजनाचा भाग आहे .
मी आपली शिफॉन साडी नेसून , केस कसेबसे गुंडाळून आणि गेल्या १० वर्षात सुडौल पासून बेडौल बनण्यात यशस्वी झालेली , गबाळी बाई !! अशात Stop वर मला एखादी सुंदर मुलगी दिसली तर की व्हावे ?? त्यातच त्या सुंदर मुलीचे प्रेमप्रकरण असेल तर ...... अर्थातच माझे मनोरंजन !!!!
नवऱ्याशी भांडून बाहेर पडले तोच दिवस... जेव्हा ती पहिल्यांदा भेटली ... म्हणजे दिसली ..........
पांढरा शुभ्र ड्रेस , लांबसडक केस , बोटे तर अगदी रेखीव , नखांवर आणि गालांवर गुलाबी रंगाचा शिडकावा ..... दात तर अगदी मोत्यांसारखे ... केवढी सुंदर आहे ती....
' नर्मदा मावशीच्या गौरव ला शोभेल नाही ??' मनातला एक विचार ... ' जातीतली आहे का ??' त्या विचाराला उत्तर !
इतक्यात तो आला ... ' कसला स्मार्ट आहे .... software वाला असेल ... छ्या !!! software वाला बस ने कशाला कडमडेल ??? ' ...' कुठे का कामाला असेना हिला शोभेल नं??? नाहीतर आमच्या वाटयाला कसले ध्यान आले आहे ................'
' अरे अरे हे काय ? त्यांची तर नजरानजर पण सुरु झाली आहे . आणि मी कसला शोभण्याचा विचार करत बसले आहे ? '
ती दोघं एकमेकांकडे पाहत होती ..... ' अरेच्चा हसली की ... हम्म !!! हंसी तो फसी ... पण पहिल्याच भेटीत ??? Love at first sight ??? '
इतक्यात बस आली आणि ती एकात मी आणि तो दुसऱ्या बस मध्ये चढलो .
दुसऱ्या दिवशी stop वर नवीनच प्रकार पाह्यला मिळाला . तो आला ..... मी होतेच ... ती पण आली .. ' हे काय पाहतेय मी ??? day २ लाच ?? ' बाईनी चढताना एक कागदाचा बोळा टाकला आणि याने उचलला ?? ' फारच forward बाई हे प्रकरण !! आशु ला ( माझी लेक वय वर्षे ८ ) सांभाळायला पाहिजे !! जमाना कसला खराब आहे बाई आत्ताच !!! राम राम राम ..... '
त्या दिवशी पण तो आणि मी एकाच बस मध्ये !!! ' काय असेल त्या कागदावर ?? भेटायची जागा ?? छे .... जागा नसेल तर मग काय ??? प्रेमपत्र ??? ह्यांनी लग्न ठरल्यावर लिहिलेले तसे ???? इश्श !!! कित्ती छान लिहिलेले !!! अजून आठवले तरी गुदगुल्या होतात मला !!! डोकावून पाहू का ??? छे !! दिसत पण नाही आहे !! लांबचा चष्मा !!! चाळीशीच्या आत दुखणी आलीत !! ' काल त्याचा आणि माझा उतरण्याचा stop वेगळा होता आणि आज तर तो माझ्याच stop वर उतरला.
'आणि हे काय पाहतेय मी ???' त्याने एका सुंदर मुलीला उतरल्या उतरल्या हात केला . ' ऑफिस मधली असेल !! नाहीतर काय मी आणि कुलकर्णी नाही का जात कधी कधी एकत्र stop वर ? मला वाटतं बाई त्या कुलकर्णीना मी जाम आवडते , पण त्यांना उशीर झाला आणि माझे लग्न झाले !! पस्तिशीत पण maintained आहे मी ! थोडीशी जाडी वाढली आहे एवढंच !! '
इतक्यात........ ' हे काय बाई नवीन ???' त्या दोघांनी एकमेकांचे हात धरून चालायला सुरुवात केलेली . ' काय बाई हा माणूस आहे ? पत्र एकीकडून आणि मिठी दुसरीला ?? पुरुष असतातच असले !! कुलकर्णी नाही का .... त्या जोशी बाईंकडे पाहून हसतात आणि फिरायला मी !!! पण हे प्रकरण जरा भलतेच forward आहे आणि fast पण !! काल ती पोरगी दिसतेय म्हणेपर्यंत इकडे हातात हात ? ' विचार करता करता मी ऑफिस च्या दारात !!
हा प्रकार , हे चक्र गेले ६ महिने चालत आहे ! हम्म आता चिट्ठी ऐवजी ती कधी फुले देते , कधी रंगीत कागदात गुंडाळलेले गिफ्ट देते , कधी chocolate देते आणि हा माणूस ते उतरल्यावर त्या stop वाली ला देतो ' stop वाल्याच दोघी !! पण ती stop वाली आणि हि ? हि सुंदरा !! सांगावे का तिला हा माणूस काय लायकीचा माणूस आहे ते ? की यालाच थोबाडात ठेवून द्यावी आणि म्हणावे काय चालले आहे म्हणून ? माणूस आहे की सैतान ? २ - २ पोरी फिरवतो , लाज नाही वाटत ? बरे दुसरी पण देखणी आहे ! आणि जरा जास्तच हुशार आहे !! याच्याकडून लुटते सगळे !! आणि हिच्या नशिबात काय ? काही नाही !! नुसतच देत राहणे आणि हा निर्लज्ज घेत राहतो !!! " तू आहेस म्हणून आहे सगळे नाहीतर काय ? कसे जमवले असते " हे ठेवणीतले वाक्य !!! '
रोजचे हे विचारचक्र थांबतच नव्हते. काही तरी करायलाच हवे . पण कसे ते काळात नव्हते . ' आज ती एकटीच आहे . तो दिसत नाही . हीच संधी साधते ' मी स्वतःशी बोलत बोलत तिच्यापाशी जाऊन पोहोचले . इतक्यात तिची बस आणि हा गुंडा आले !! ' छे मनात बोलण्यात फार वेळ गेला. आता उदयाला ..... '
मी आणि तो नेहमीप्रमाणे एकाच बस मध्ये 'हा माझ्याकडे पाहून का हसतोय ? म्हणेल तिला नका सांगू. पण मी नाही ऐकणारे काही त्याचे' .....
पुन्हा आज तोच प्रकार stop वाली आणि हा ......................
दुसऱ्या दिवशी मी जरा लवकरच निघाले. ही आली की बोलू असे ठरवूनच !!! पण हे काय ??? आज हे दोघे आलेच नाहीत. पुढचे १५ - २० दिवस आले नाहीत दोघे !! ' पळून गेले असतील ... किंवा शिफ्ट ?? दोघे एकदम कसे शिफ्ट होतील ??? '
हळू हळू त्यांच्या नसण्याची सवय होते आहे म्हणेपर्यंत हे काय पाहतेय मी आज ???? ' त्या दोघी आणि हा गुंड एकत्र ??? आणि हे काय ??? stop वाली च्या गळ्यात मंगळसूत्र ???? '
इतक्यात सुंदराचा आवाज " जिजाजी आता तरी पोस्टमन ला दिवाळी द्या !! आणि ताई ते सगळे chocolates , गिफ्ट्स मीच आणायचे ह्म्म्म !!! पैसे तेवढे जीजुचे !!! का ssssssssssss य जीजू ???? मला काय मिळणार आता ??? "
" तुला ती १३ लाखाची गाडी ...... " तो म्हणाला
हा संवाद ऐकून मला भोवळच आली !!! इतक्यात आलेल्या बस मध्ये बसून सुंदरा गेली पण !!! आणि हे जोडपे बस ची वाट पाहत उभे राहिले !!!
' एकाच area मध्ये राहत असतील !! कसे पडले प्रेमात ??? काय असायचे पत्रात ?? आणि मग हि चिठ्ठ्या टाकून का द्यायची ??? हातात का नाही ??? घरातले कोणी पाहिलं तर ..... ची भीती असेल ???? आणि ??????????? ' ' पुरे !!!! ' माझ्या दुसऱ्या मनाचा दरडावून सांगणारा आवाज ..... 'आता तरी शहाण्या व्हा बाई '
इतक्यात बस आली आणि माझा प्रवास सुरु झाला त्या दोघांसोबत आणि नवीन विचारांसोबत ......
' भाजी काय करूयात आज ??? जाताना नेते ....... "
fundo boss .....ekdam sahi ....
ReplyDeleteNice one...... :)
ReplyDeleteBharrrrrrri :)
ReplyDelete